छंद सुगंधाचा🌷

छंद सुगंधाचा🌷

देवेंद्र, मृणाल आणि साक्षी (भट) - एक आनंदी-सुगंधी कुटुंब. या कुटुंबाचे वैशिष्ट्य - त्यांच्यातील एक समान दुवा म्हणजे या तिघांनाही असलेला सुगंधाचा छंद आहे. तिघेही सुगंधाचे चाहते आहेत. जाणकार आहेत. गेली 5 वर्षे हे कुटुंब देवसाक्षी या ब्रॅंड अंतर्गत आपल्याकडील अगरबत्ती, धूप, अत्तर अशा सुगंधी उत्पादनाचा विविध मार्गाने प्रचार-प्रसार करून प्रत्येक घर सुगंधी करत आहेत. 

या कुटुंबाची आणि माझी ओळख ऑक्टोबर 2021 मध्ये उद्योगऊर्जा ग्राहक पेठेत झाली. तिथे त्यांनी आपला स्टॉल मांडला होता. आपल्या व्यवसायावर / उत्पादनांवर मनापासून प्रेम करणारे व्यावसायिक लगेच ओळखता येतात. माझी पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया मी त्यांना तिथेच दिली होती.  

त्यानंतर काही दिवसांपूर्वी माझी आणि देवेंद्र सरांची पहिली 1-2-1 मिटिंग आमच्या ऑफिस मध्ये झाली. आणि काल म्हणजे, शनिवार, 9 एप्रिल, सायंकाळी 8 वाजता संपुर्ण "देवसाक्षी" परिवारासोबत झालेली आमची दुसरी मिटिंग व्यावसायिक असली तरी अतिशय हसत-खेळत संपन्न झाली. कुटुंबातील तिघांचेही व्यक्तिमत्व-स्वभाव हसतमुख आणि खेळकर आहे. आवडी-निवडी या अतिशय युनिक आहेत आणि त्यांच्या बिझनेस वाढीसाठी परिपूर्ण आणि पोषक आहेत. कुमारी साक्षी बेडेकर महाविद्यालयात आर्ट्सचे शिक्षण घेत असून विविध क्षेत्रात पारंगत आहे. देवेंद्र सर अनेक वर्षे लॉजिस्टिक्स क्षेत्रात आहेत. 

या ब्रॅंडचे योग्य री-ब्रंडिंग, MAKEOVER, परफेक्ट STRATEGY + अॅक्शन प्लान, जबरदस्त INNOVATIVE कॉम्बो प्रॉडक्ट सेट, आधुनिक प्रमोशन तंत्र आणि लोकल फोकस अशा मार्गाने येत्या 1000 दिवसांत हा ब्रॅंड डोंबिवली-कल्याण मधील 10000 घरात सहज पोहचू शकतो यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. 

देवेंद्र सर, आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि दैदिप्यमान कारकिर्दीसाठी माझ्यातर्फे, टीम उगम🌱क्रिएटिव्ह आणि उद्योग🌞ऊर्जा परिवारातर्फे हार्दिक सदिच्छा!!!🌈💐💐 All the Best 👍👍🎯🎯

धन्यवाद!!!

आपला सर्वांचा मित्र आणि हितचिंतक 

BrandBond निलेश B+

क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ
संचालक - उगमक्रिएटिव्ह_
सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!!!
सह-संस्थापक उद्योग☀ऊर्जा आपला बिझनेस कट्टा
चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!!
https://tiny.one/BrandBond



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट