छंद सुगंधाचा🌷
छंद सुगंधाचा🌷 देवेंद्र, मृणाल आणि साक्षी (भट) - एक आनंदी-सुगंधी कुटुंब. या कुटुंबाचे वैशिष्ट्य - त्यांच्यातील एक समान दुवा म्हणजे या तिघांनाही असलेला सुगंधाचा छंद आहे. तिघेही सुगंधाचे चाहते आहेत. जाणकार आहेत. गेली 5 वर्षे हे कुटुंब देवसाक्षी या ब्रॅंड अंतर्गत आपल्याकडील अगरबत्ती, धूप, अत्तर अशा सुगंधी उत्पादनाचा विविध मार्गाने प्रचार-प्रसार करून प्रत्येक घर सुगंधी करत आहेत. या कुटुंबाची आणि माझी ओळख ऑक्टोबर 2021 मध्ये उद्योगऊर्जा ग्राहक पेठेत झाली. तिथे त्यांनी आपला स्टॉल मांडला होता. आपल्या व्यवसायावर / उत्पादनांवर मनापासून प्रेम करणारे व्यावसायिक लगेच ओळखता येतात. माझी पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया मी त्यांना तिथेच दिली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी माझी आणि देवेंद्र सरांची पहिली 1-2-1 मिटिंग आमच्या ऑफिस मध्ये झाली. आणि काल म्हणजे, शनिवार, 9 एप्रिल, सायंकाळी 8 वाजता संपुर्ण "देवसाक्षी" परिवारासोबत झालेली आमची दुसरी मिटिंग व्यावसायिक असली तरी अतिशय हसत-खेळत संपन्न झाली. कुटुंबातील तिघांचेही व्यक्तिमत्व-स्वभाव हसतमुख आणि खेळकर आहे. आवडी-निवडी या अतिशय युनिक आहेत आण...
